मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक असणारे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यलयास दिली भेट

भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

0

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असतान अचानक त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेकट्टर समर्थक असणारे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या चिंचवड येथील कार्यलयात जाऊन त्यांची भेट घेतली . याभेटीमुळे पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. ते राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे विश्वासूमानले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णा बनसोडे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अण्णाबनसोडे यांची सदिच्छा भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेतेही उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.