‘या’ कारणामुळे ‘एसीबी’ने मारला छापा

वाचा सविस्तर....

0

पिंपरी : खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक, पोलीसशिपाई आणि एका इसमावर लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. हा सर्व प्रकार निगडी पोलीस स्टेशन येथेघडला

या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे, सागर तुकाराम शेळके (पो.शिपाई, दोघांची नेमणूक निगडी पो.स्टे. पिंपरीचिंचवड पो.आयुक्तालय) आणि सुदेश शिवाजी नवले (43वर्ष, रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) या तिघांना अटक करण्यात आलीआहे. या प्रकरणी एका 48 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी महिलेने एका ओळखीच्या व्यक्तीला काही पैसे कॅश आणि काही पैसे बँकेतून उसने दिले होते. परंतु, समोरील व्यक्तीने बँकेचे हप्ते भरल्याने या महिलेने आपले पैसे परत मागितले. परंतु, सदर व्यक्तीने फिर्यादी महिलेविरुद्धतक्रारीचा अर्ज दाखल केला.

हा अर्ज  सहायक पोलीस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे यांच्याकडे तपासणीसाठी आला असता अमोलने फिर्यादी महिलेकडे खंडणीचागुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांची लाच मागितली. यासाठी  पोलिस शिपाई सागर शेळके आणि सुदेश नवले यांनीमदत केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई अमोल तांबे  (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र), शीतल जानवे (अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.) यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक माधुरी भोसलेपोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर, पो.हवा. नवनाथ वाळके, पो.शि. सौरभमहाशब्दे, .पो.शि. शिल्पा तुपे, आणि चालक पो.शि. पांडुरंग माळी, ला.प्र.वि. पुणे यांनी केली केली.

जर कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळआमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.