भरदिवसा गोळीबार करणारे तीन अल्पवयीन ताब्यात

0

पुणे : पुणे शहरातील वारजे माळवाडी भागातील जयभवानी चौक परिसरात एका सराईत गुन्हेगारवर भरदिवसा गोळीबार करून पसार झालेल्या तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. गोळीबार करणारे तिघे जण अल्पवयीन असल्याची बाब उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

क्रिक्रेट खेळण्याच्या वादातून वारजे भागातील जयभवानी चौकात सूरज तात्याबा लंगर (वय- 21, रा. वारजे माळवाडी) याच्यावर शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तीन जणांनी गोळीबार केला. यावेळी जीव वाचविण्यासाठी पळालेल्या सूरजचा पाठलाग करुन त्याच्यावर पिस्तूलातून आरोपी कडून गोळीबार करण्यात आला होता. तरुणाचा पाठलाग करुन गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर संबधित परिसरात दहशत निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना पकडण्याच्या सूचना वारजे पोलिसांना दिल्या होत्या.

त्यानुसार वारजे पोलिसांचे पथक हल्लेखोर आरोपींच्या मागावर होते. लंगर याच्यावर गोळीबार करणारे आरोपी पुणे शहारा बाहेर पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस नाईक प्रदिप शेलार आणि बंटी मोरे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने तिघांना चांदणी चौक परिसरात पकडले आहे. त्यांची अंग झडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे देशी बनावटीची दोन पिस्तूले सापडली आहेत. गोळीबार करणारे तिघे जण अल्पवयीन असल्याची बाब उघडकीस आली आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे शाखेच निरीक्षक दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, पोलीस नाईक प्रदिप शेलार, अमोल राऊत, हनुमंत मासाळ, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विकी खिलारी आदींनी ही कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.