माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल

रावेत येथील जागेवर अतिक्रमण केल्याचा प्रकार

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हादाखल झाला आहे. जागेवर अतिक्रमण केल्याचा हा प्रकार 17 जून रोजी रावेत येथे घडला.

कुणाल मोरेश्वर भोंडवे, महेंद्र जगन्नाथ गरड, अनिकेत मनोज चव्हाण (29, रा. नवी सांगवी), विशाल माणिक गायकवाड (27, रा. डांगेचौक, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कांतीलाल मोतीलाल कर्नावट (67, रा. चिंचवड) यांनी रावेतपोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या जागेत जेसीबीच्या सहाय्याने आरोपींनी अतिक्रमण केले. फिर्यादी यांनी याबाबतविचारणा केली असता ही जागा कुणाल मोरेश्वर भोंडवे आणि महेंद्र जगन्नाथ गरड यांची असल्याचे सांगत अतिक्रमण सुरूच ठेवलेअसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत रावेत पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गवारे म्हटले कि; कर्नावट यांनी तक्रार दिलेली असून प्राथमिक कागदपत्रे पाहून गुन्हादाखल करण्यात आलेला आहे.

तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.