माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उधळला; पिस्तुलासह तिघांना अटक

0

पिंपरी : पुनावळे येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि भाजप मध्ये प्रवेश केलेले शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कटरचल्याप्रकरणी तिघांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पिस्तूल जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलीआहेत.

किशोर बापू भोसले (३१, रा. पुनावळे), अमित दत्तात्रय पाटुळे (२३ रा. शिंदेवस्ती चौक, रावेत), अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले(३४, रा. पुनावळे गावठाण), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकातील पोलीस नाईक आशिष बोटके आणि प्रदीप गोडांबे यांनाबातमी मिळाली की, सराईत गुन्हेगार किशोर भोसले अमित पाटुळे हे गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुनावळे येथील स्मशानभूमी येथेयेणार असून, त्यांच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार, त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे(राऊंड) जप्त करण्यात आली.

दरम्यान, त्यांनी पिस्तुल संशयीत आरोपी गोरगले याच्या सांगण्यावरून आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार यांच्याकडून आणलेअसल्याचे सांगितले. त्यानुसार, संशयीत आरोपी गोरगले यास अटक केली. त्यानंतर संशयीत आरोपींकडे पिस्तूल आणण्याचा उद्देशविचारला असता, त्यांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांच्याशी माथाडीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे त्यांची हत्याकरण्यासाठी पिस्तूल आणल्याची कबुली दिली. संशयीत आरोपींनी दिलेल्या कबुलीमुळे राजकीय आणि पोलिस वर्तुळात एकचखळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.