जुलै मध्ये मंत्रीमंडळ विस्तार : फडणवीस

0

मुंबई : जुलै महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील, अशी महत्त्वपूर्ण माहितीराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे अखेर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लवकरच निश्चित होणारअसल्याचे दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्रफडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीतमंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरल्याची माहिती आहे.

बैठकीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठीच काल दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. याशिवाय आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. जुलैमध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू.

दरम्यान, भाजपश्रेष्ठी शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारकरताना या मंत्र्यांची हकालपट्टी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनीही शिंदे गटाच्याचार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल, असा दावा केला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांना कोणतीही बातमीमिळाली नाही, तेच लोक अशा बातम्या पेरतात. यात कोणतीही विश्वासार्हता नाही.

शिंदे गटाच्या दोन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीहीशिवसेनेच्या दोन मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत, असे वक्तव्य केले. त्यावर देवेंद्र फडणवीसम्हणाले, केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, हे आम्हाला माहिती नाही. केंद्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा एकमेकांशीकाहीही संबंध नाही. आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्त इंटरेस्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.