समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील मायलेकीसह सासूचा मृत्यू

0

पिंपरी : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात होरपळून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंपरीचिंचवडमधीलमायलेकीसह सासूचा समावेश आहे. वनकर कुटुंब हे शहरातील पिंपळे सौदागर भागात राहते. संगणक अभियंते असलेलेप्रणित वनकर यांच्या आई, दोन वर्षीय मुलगी आणि पत्नी काही दिवसांपूर्वी लग्न समारंभासाठी नागपूरला गेल्या होत्या. ते नागपूरहूनट्रॅव्हल्सने परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या दुःखद घटनेमुळे पिंपळे सौदागर परिसरात शोककळा पसरलीआहे

नागपूरवरून निघालेल्या ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात होरपळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की मृतांची ओळख पटवने देखील कठीण झालेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची नोंद घेऊन मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करत मृतांनाश्रद्धांजली वाहिली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेत नातेवाईकांचे सांत्वन केले.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील ट्रॅव्हल्समध्ये पिंपरीचिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथे राहात असलेलं वनकरकुटुंबातील दोन महिला आणि एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. प्रणित वनकर हे संगणक अभियंते असून त्यांची आई, दोन वर्षीयमुलगी आणि पत्नी या नागपूर येथे लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. प्रणित वनकर देखील गेले होते. परंतु, ते गेल्या आठवड्यातचपुण्यात परत आले आणि आई, मुलगी आणि पत्नी ट्रॅव्हल्सने सोबत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. याघटनेमुळे पिंपरीचिंचवड शहरावरती शोक काळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.