जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या वाहनाला अपघात

0

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. बुधवारी दुपारी पुणेनाशिकमहामार्गावर हा अपघात झाला. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे हा अपघात झाला आहे.

आयुष प्रसाद यांच्या इनोव्हा कारला ट्रकने धडक दिली.

या धडकेत इनोव्हा कारचे दोन्ही टायर फुटले. मात्र फक्त देव बलवत्तर म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या अपघातातूनवाचले. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेले अंगरकक्षही या अपघातातून बचावले.

पुण्यावरून जुन्नर येथे केंद्रीय सचिव दौऱ्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे. मंचर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखलकेली गेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.