पिंपरी : मुलाने घेतलेले नवीन घर पाहण्यासाठी आलेल्या वृद्ध आईचा खून झाल्याची घटना चिखलीपरिसरात घडली आहे. वृद्ध महिला घरी एकटी असताना तिच्या डोक्यात स्टीलचा बत्ता घालून तसेचचाकूने वार करत खून झाला आहे.
ही घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास राजमाता जिजाऊ हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे येथेघडली.
शोभा जगन्नाथ आमटे (68, रा. रुपीनगर, तळवडे. मूळ रा. बेरडवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा पोपट जगन्नाथ आमटे (वय 38, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसारअज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र बर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई त्यांच्या गावी राहतात. फिर्यादी मागील अनेकवर्षांपासून पिंपरी–चिंचवड शहरात राहतात. त्यांनी नुकतेच नवीन घर घेतले. त्यासाठी शोभा या 23 जून रोजी मुलाचे नवीन घरपाहण्यासाठी रुपीनगर येथे आल्या होत्या. त्यांनतर त्या आजारी पडल्या. त्यांना रुग्णालयात काही दिवस दाखल केले होते. दवाखानाझाल्यानंतर त्या काही दिवसांनी गावी जाणार होत्या.
मागील काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. गुरुवारी सकाळी फिर्यादी कामासाठी बाहेर गेले. त्यावेळीत्यांच्या आई घरात एकट्या होत्या. सकाळी सव्वा अकरा ते पावणे बारा वाजताच्या सुमारास अज्ञातांनी घरात येऊन शोभा यांच्याडोक्यात स्टीलचा बत्ता घातला. त्यानंतर चाकूने वार केले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शोभा या घरात एकट्याअसल्याने चोरीच्या उद्देशाने आलेल्यांना प्रतिकार केल्याने खून झाला आहे का याची पुष्टी पोलिसांनी केली असता घरातील सर्व सामानजागच्या जागी आहे. त्यामुळे महिलेचा खून कोणत्या कारणांवरून झाला असेल, याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. चिखली पोलीसतपास करीत आहेत.