नोकरीच्या आमिषाने 60 ते 70 ‘आयटी इंजिनिअर’ची फसवणूक

गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने घेतले ताब्यात

0

पिंपरी : आय टी कंपनी मध्ये कामाला लावण्याचं आमिष दाखवत लाखोंची फसवणुक करणाऱ्या आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसआयुक्तालयाच्या गुन्हे शाखा च्या पथकाने अटक केलीय. अटकेत असलेल्या आरोपींनी अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावे बनावटनियुक्तीपत्र देऊन साठ ते सत्तर मुला मुलींची फसवणूक केलीय.

आरोपी या मुला मुलीकडून नोकरी साठी फोन पे , गूगल पे, चेक द्वारे पैसे घेत त्यांची फसवणुक करत होते .जवळपास ५० लाखरुपयांची फसवणूक आरोपींनी केली आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखा ने आरोपी नामे महेंद्रकुमार कोली ,अनुदिप शर्मा ,श्रावण शिंदे आणि एक महिला आरोपी यांना ताब्यात घेतलअसून त्यांच्यावर भा वी कलम ४१९, ४२०, ४०६ ,४६५ अन्य कलामा अंतर्गत कारवाई केली आहे.

हि कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्तस्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षकसिद्धनाथ बाबर आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.