गुंडा विरोधी पथकास सलग दुसऱ्यांदा आयुक्तांकडून कौतुकाची थाप

0
पिंपरी : शहरातील गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने उत्कृष्ठ कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुंडा विरोधी पथकासह युनिट एक, चार, दरोडा विरोधी पथकासह भोसरी, चाकण, दिघी, वाकड पोलिसांचा सन्मान केला. मासिक गुन्हे आढावा बैठकीत हा सन्मान करण्यात आला असून गुंडा विरोधी पथकाने सलग दुसऱ्यांदा आयुक्तांची कौतुकाची थाप मिळवली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून विशेष दर महिन्याला मोहीम रामवण्यात येत आहेत. त्यानुसार पोलिसांना टास्क देऊन निकोप स्पर्धा निर्माण करून गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अत्यापर्यंत शस्त्रे जप्त करणे आणि फरार आरोपी अटक करणे अशा टास्क देण्यात आल्या होत्या.
दिलेल्या टास्कमध्ये तसेच कायदा सुववस्थेच्या दृष्टीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा क्राईम मीटिंगमध्ये सन्मान करण्यात येतो. त्यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत गंभीर गुन्ह्यात फरार असणाऱ्या तसेच सराईत आरोपींसह टोळ्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या गुंडा विरोधी पथक, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट एक, युनिट चारचा सन्मान करण्यात आला. तर पोलीस ठाणे स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भोसरी, चाकण, दिघी, वाकड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या पाठीवरही आयुक्तांनी कौतुकाची थाप दिली.
Leave A Reply

Your email address will not be published.