सोलापूर मध्ये बँक फोडून पळाले अन वाकड पोलिसांच्या जाळ्यात अडकले

0

पिंपरी : माळशिरस, जि.सोलापुर येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक  फोडून 51 लाख 16 हजार रुपयांची रोकड घेऊनपळालेल्या चोरट्यांना  वाकड पोलिसांनी पिंपरी मधून अटक केली. बँक फोडून पळालेल्या चोरट्यांना बारा तासाच्या आत अटककरण्यात आली आहे.त्यांच्याकडून रोकड जप्त करण्यात आली आहे.


फैसल इब्राहीम शेख (२९, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. ठाणे), शाहरुख सत्तार पटवारी (२८, रा. औंध. मूळ रा. लातूर) अशी अटककेलेल्या आरोपींची नावे आहेत.
मंगळवारी दि. १८ रोजी पहाटे माळशिरस येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा सदाशिवनगर येथे तीन चोरट्यांनी गॅसकटरच्या सहाय्याने बँकेच्या स्ट्रॉंगरुम मधून ५१ लाख १६ हजार ४७७ रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच चोरट्यांनी बँकेच्या लॉकररूममधील सहा लॉकर गॅस कटरने फोडले.
चोरी केल्यानंतर आरोपी चोरी करणाऱ्या साठी वापरलेले साहित्य बँकेतच टाकुन पैसे घेऊन पळून गेले होते. हा प्रकार मंगळवारीसकाळी पावणे दहा वाजता उघडकीस आला. याप्रकरणी बँकेचे शाखा अधिकारी भारत लोंढे यांनी माळशिरस पोलीस ठाण्यातफिर्याद दिली.


मंगळवारी सायंकाळी वाकड पोलीस गस्त घालत असताना सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना माहिती मिळाली की, माळशिरस येथे बँक फोडून पळालेले आरोपी पिंपरी येथे येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी मोहननगर कडून मोरवाडी कोर्टाकडेजाणाऱ्या रस्त्यावर सापळा लाऊन एक पांढरे रंगाची स्विफ्ट डिझायर कार नं. एमएच. १४. एचक्यु. ९७८१ पकडली.


कारमधून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी माळशिरस येथे बँक फोडल्याचे त्यानी सांगितले. कारचीझडती घेतली असता त्यामध्ये पोलिसांना लाख १० हजार रुपये रोख रक्कम मिळाली. दोन्ही आरोपींना सोलापूर स्थानिक गुन्हेशाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.


ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त, परि. पिंपरी चिंचवड, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त. वाकड विभाग, पिंपरीचिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोषपाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफी बाबाजान इनामदार, सपोफो. राजेंद्र काळे, पोहवा. बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. अतिश जाधव, पोहवा.प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पीना. राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि, सौदागर लामतुरे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि. सागर पंडीत परि ०२ कार्यालय यांनी मिळून केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.