आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

0

पुणे : बोरघाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आडोशी बोगद्याजवळ आज (रविवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास मोठी दरडकोसळली. त्यामुळे पुणेमुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीहीजीवितहानी झाली नाही.

बोरघाटात अमृतांजन पॉईंट आडोशी बोगदा या दरम्यान किलोमीटर 41 जवळ ही दरड कोसळली आहे. दरड कोसळली त्यावेळीकोणतेही वाहन रस्त्यावर नसल्याने जीवितहानी टळली. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आलीआहे. दरड रस्त्यातून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.

दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.