महापालिका हद्दीतील गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड कार्यालयात करण्यासाठी हालचाली

0

पिंपरी : पिंपरीचिंचवड महापालिका हद्दीतील गावांचा समावेश हवेली कार्यालयाऐवजी पिंपरीचिंचवड भूमी अभिलेखकार्यालयांतर्गत होण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी नुकतीच त्या बाबतसकारात्मकता दर्शवली आहे. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सुचना मंत्री विखेपाटील यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. आमदार महेश लांडगे यांनी या बाबत पाठपुरावा सुरू केला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मंत्रालय येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची आमदार महेश लांडगे यांनी भेटघेतली. यावेळी भूमी अभिलेखच्या मागण्यांबाबत आमदार लांडगे यांनी निवेदन दिले.

भूमी अभिलेख कार्यालयातून शेत जमिनीची मोजणी, जमिनीचे नकाशे, भूसंपादनाची मोजणी, न्यायालयातून आलेल्या प्रकरणाचेनिर्गतीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या मोजणी, खरेदी विक्री, वारसा वाटणी नोंदी आदींसह त्या संदर्भातीलदाखले, नमुने देण्याचे काम केले जाते. पिंपरीचिंचवड महापालिका हद्दीतील काही गावांचा समावेश हवेली भूमी अभिलेखकार्यालयांतर्गत येत होता.

त्यामुळे नागरिकांना पुणे येथील कार्यालयात आपल्या कामांसाठी जावे लागते. या ठिकाणी काम झाल्यास पुन्हा जावे लागत होते. यामुळे वेळ पैसा खर्च होत होता. मात्र आता नागरिकांची ही गैरसोय टळणार आहे.

पूर्वी पिंपरीचिंचवड महापालिकेच्या हद्दीतील काही गावांचा हवेली तहसील कार्यालय अंतर्गत समावेश होता. मागील काहीकालावधीमध्ये सदर गावे पिंपरीचिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्नीत करण्यात आलेली आहेत. त्यामुळे तहसीलशी संबंधीतकामांची होणारी नागरिकांची गैरसोय टळली आहे. त्याच धर्तीवर भूमी अभिलेख हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरीचिंचवडमहापालिकेच्या हद्दीत आहेत.

ही गावे भूमी अभिलेख कार्यालय पिंपरीचिंचवड या कार्यालयाशी संलग्नील करण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली. त्यामुळे नागरिकांना जमीन मोजणीकरिता तसेच प्रॉपर्टी कार्डच्या या कामासाठी हवेली भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाण्याचीभौगोलिक दृष्ट्या गैरसोय टळेल, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली.

याबाबत मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून  त्या बाबतचा प्रस्ताव त्वरीत सादर करण्याच्या सूचनासंबंधित विभागाला दिल्या आहेत.

बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, होली, चोवीसावाडी, डूडूळगाव, मोशी, चिखली, देहू, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे आदी गावे नगरभूमापन अभिलेख पिंपरीचिंचवड कार्यालयाशी संलग्नीत करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्याकडे केली.

Leave A Reply

Your email address will not be published.