पिंपरी: पिंपरी–चिंचवड महापालिकेने नदी पुनरूज्जीवन (सुधार) प्रकल्प राबविण्यासाठी अखेर 200 कोटींचे कर्ज घेतले आहे. मुळानदीच्या सुधारमधील वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंतच्या कामासाठी खर्च करण्यात येणार आहे.पालिकेने शासनाच्या सर्व मान्यताआणि प्रक्रिया पूर्ण करून अखेर हे 200 कोटींचे कर्ज घेतले आहे.
या संदर्भात माहिती देताना महापालिकेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे म्हणाले की, चालू आर्थिक वर्षातील देशातीलमहापालिकेमार्फत काढण्यात येणारे हे पहिलेच कर्जरोखे आहेत. यापुर्वीचे मध्यप्रदेशातील इंदूर महापालिकेने फेब्रुवारी २०२३ मध्ये८.२५ टक्के दराने कर्जरोखे जारी केले होते. पिंपरी महापालिकेने ८.१५ टक्केच्या दरावर २०० कोटी रुपयांची रक्कम कर्जरोख्याद्वारेजाहीर केली होती.
या प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांकडून तब्बल ३१५ कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यापैकी महापालिकेलाआवश्यक 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे घेण्यात आले. कर्जरोख्यामुळे केंद्र सरकारकडून २६ कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानमिळण्यास महापालिका पात्र ठरणार आहे. महापालिकेच्या उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन व आर्थिक शिस्त यामुळे कर्जरोखे यशस्वीरित्याउभारण्यास मदत झाली आहे. तसेच सदरच्या कर्जरोख्यामुळे प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी नवीन पर्यायी मार्ग खुला झाला आहे.
पिंपरी–चिंचवडसाठी 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे प्राप्त झाले असून यामुळे उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन, शहरी पायाभूत सुविधांवरीलमागणी वाढत असताना महापालिकांना वित्त पुरवठ्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आगामी काळामध्ये कर्जरोखे महत्वपुर्ण ठरतील.
– शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी–चिंचवड महापालिका