पिंपरी : एचआरकडे तक्रार केल्याच्या रागातून तिघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच तरुणाच्या दुचाकीची तोडफोडकरून नुकसान केले. ही घटना बुधवारी (२६ जुलै) रात्री नऊ वाजताच्या सुमारास निघोजे गावात महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर दोन समोरघडली.
सोमेन शंकर माल (२८, रा. वाकी खुर्द, ता. खेड. मूळ रा. पश्चिम बंगाल) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यातफिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश गायकवाड (रा. निघोजे, ता. खेड) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी गणेश हे एकाच कंपनीत काम करतात. गणेश हा काम करत नसल्याने त्याचीतक्रार फिर्यादी यांनी एचआरकडे केली. त्या रागातून गणेश याने त्याच्या दोन साथीदारांसोबत येऊन फिर्यादीस शिवीगाळ करून लाकडीदांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. महाळुंगे एमआयडीसीपोलिस तपास करीत आहेत.