शस्त्र बाळगल्या प्रकरणी एका तडीपार गुंडाला अटक

0

पिंपरी : शस्त्र बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तडीपार गुंडाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 1) मध्यरात्री रहाटणीयेथे करण्यात आली.

पंकज हरिप्रसाद बाजुळगे (वय 25, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रमेश खेडकरयांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज याला 12 ऑगस्ट 2022 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने बेकायदेशीरपणे स्वतःकडे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळालीअसता पोलिसांनी पंकज याला शस्त्रासह अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.