पिंपरी : एकाच जमिनीचा दोघांशी व्यवहार केला. याबाबत विचारणा केली असता एकास शिवीगाळ दमदाटी केली. याप्रकरणीतिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 जुलै ते 6 ऑक्टोबर या कालावधीत मावळतालुक्यातील परंदवडी येथे घडली.
प्रकाश बोदुराम चौधरी (46, रा. वाकड) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संभाजी बाळू भोते, भरत बाळू भोते, बाळू महादेव भोते (सर्व रा. परंदवडी, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संभाजी यांनी परंदवडी येथील गट नंबर 275 मधील 120 गुंठे जखमी फिर्यादी यांना विक्रीचाव्यवहार केला. फिर्यादी चौधरी यांनी संभाजी यांना सदर जमीन यापूर्वी कोणास विकली आहे का, याबाबत विचारणा केली. त्यावरूनआरोपींनी फिर्यादी यांच्या कार्यालयाच्या बाहेर ठेवलेल्या खुर्च्या, टेबल, प्लॉटिंगचे ग्रील आणि झाडांचे नुकसान केले. चौधरी यांनाशिवीगाळ आणि दमदाटी केली. चौधरी यांच्या अगोदर अनुज गोयल यांच्या बरोबर करारनामा करून ती बाब लपवून ठेवत फिर्यादीयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.