पिंपरी :जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी–चिंचवड मध्ये पुकारण्यातआलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच प्रमुख्य बाजारपेठा बंद होत्या. कपडा मार्केट, किराणा, इलेक्ट्रिक आणिइलेक्र्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि सराफ मार्केट बंद असल्याने किमान 100 कोटींची उलाढाल ठप्प झाली होती.
शनिवारी सकाळपासूनच बंदला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डीलक्स चौक मार्गे,मेन बाजार पिंपरी या मार्गाने मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे दाखल झाला. या दरम्यानसकाळी सात ते सायंकाळ प्रयत्न सर्व प्रमुख्य बाजारपेठा बंद होत्या. यामध्ये निगडी, थरमॅक्स चौक, भोसरी, मोशी, वाकड, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, रावेत येथे शुकशुकाट होता.
पिंपरी शहरात मोबाईल, किराणा, कपडे आणि फर्निचरचे होलसेल आणि रिटेल मार्केट आहे. येथून दिवसाकाठी 70 ते 80 कोटीरुपयांची उलाढाल होत असते. त्यातच गौरी गणपती सण जवळ आले आहेत. आज शनिवार अनेकांना सुट्टी असल्याने खरेदीचा बेतअसतो. आजच्या बंदमुळे व्यवहार ठप्प झाले होते.
शहरात सराफ (ज्वेलर्स) बाजारपेठ मोठी आहे. शहरात अनेक छोटे मोठे सराफ असून दिवसाकाठी 30 ते 35 कोटी रुपयांची उलाढालहोत असते. आजच्या बंदमध्ये सराफ व्यवसायिकांनी पाठींबा दर्शविला होता. त्यामुळे एवढी मोठी उलाढाल ठप्प झाली होती.
शहरात हॉटेल व्यवसाय मोठा आहे. आज शनिवार असल्याने नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात जेवणासाठी बाहेर पडत असतो. यात मोठीआर्थिक उलाढाल होत असते. याच सोबत भाजी व्यवसाय हि आज बंद होता. यातील हि मोठी उलाढाल ठप्प झाली होती.
आज पिंपरी चिंचवड बंद पुकारण्यात आले होते. या बंदला पिंपरीतील व्यापाऱ्यांचा पाठींबा आहे. पिंपरीत होलसेल आणि रिटेलचे मोठेमार्केट असून दररोज 70 ते 75 कोटींची उलाढाल होत असते.
श्रीचंद आसवानी
पिंपरी झुलेलाल मर्चंड असोसेट्सचे अध्यक्ष
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेच्या निषेर्धात पुकारण्यात आलेल्या बंदला सराफ असोसिएशनने पाठिंबादर्शवत दुकाने बंद ठेवली होती. आमचा मराठा आरक्षणसाठी पाठिंबा आहे. शहरात सराफ व्यवसायातून दररोज 30 ते 35 कोटींचेव्यवहार होतात.
दिलीप सोनिगरा
उपाध्यक्ष; सराफ असोसिएशन.