‘ऑनलाईन टास्क’च्या आमिषाने 200 कोटींची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
९५ बनावट बॅंक खाते उघडून देशातील 3 हजार कोटी नागरिकांना ओढले जाळ्यात
पिंपरी : वेगवेगळ्या प्रकारचा ऑनलाईन टास्क देऊन देशभरातील नागरिकांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याटोळीचा पिंपरी चिंचवड चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून फक्तगुन्हे उघडकीस आणेल नाही तर पहिल्यांदाच ऑनलाईन टास्क फ्रॉडमधील तब्बल १४ आरोपी जेरबंद केले आहे. या कारवाईनेशहरातील १७ ऑनलाईन टास्क फ्रॉडचे गुन्हे उघकीस आले आहेत.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार; चिंतन शशिकांत फडके (३५, रा. मध्यप्रदेश), ब्रजराज रामरतन वैष्णव (१८, रा. राजस्थान), सुंदरदास चेदनदास सिंधी (२४, रा. राजस्थान), राजेश भगवानदार करमानी (२६, रा. राजस्थान), मोहम्मद रशिद चांदमोहम्मद (४७, रा. राजस्थान), अभिषेक सत्यनारायण पाराशर (२४, रा. राजस्थान), आशिष प्रल्हादराय जाजू (३५, रा. कोंढवा), मोहम्मद रौफ मोहम्मद रशिद (२४, रा. अजमेर), नवीनकुमार नेवंदराम आसनाणी (४० रा. राजस्थान ), विकास सत्यनारायण पारिख(२९, रा. राजस्थान), सुरेश गोवर्धनदास सिंधी (३२, रा. राजस्थान), गौरव महाविर सेन (३१, रा. राजस्थान), ललित नवरतन मल पारिख(३३, रा. राजस्थान), मनिष ऋषिकेश वैष्णव (३३, रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हिंजवडी पोलिस ठाण्यात एका महिलेने ऑनलाईन टास्क फ्रॉडद्वारे तिची ७१ लाख८२ हजार ५२० रुपयांची आर्थिक फसवणूकझाल्याची फिर्याद दिली होती. हा गुन्हा गंभीर आणि तांत्रिक स्वरुपाचा असल्याने या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट चारकडे देण्यातआला होता. युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शंकर आवताडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्याचा तपास सुरुकेला. यामध्ये आरोपींनी ऑनलाईन फ्रॉडसाठी वेगळीच पद्धत वापरल्याचे त्यांच्या लक्षात आले. या गुन्ह्याचा खोलात जाऊन तपासकरत तसेच आरोपींची गुन्ह्याची पद्धत समाजावून घेत पोलिसांनी आरोपींची ओळख पटविली. त्यानुसार मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान याराज्यांमध्ये जाऊन १४ आरोपींना जेरबंद केले.
या कारवाईनंतर ऑनालाईन टास्क फ्रॉडचे १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच हे गुन्हे करण्यासाठी आरोपींनी ९५ बनावट बॅंक खातेउघल्याचेही समोर आले आहे. हिंजवडी, वाकड, चिंचवड पिंपरी, आळंदी, चिखली, अवधुतवाडी, पुर्व विभाग सायबर पोलिस, दक्षिणविभाग सायबर पोलिस, सायबर क्राईम पोलिस ठाणे, सेंट्रल सायबर पोलिस ठाणे बेंगलोर, सायबर क्राईम पोलिस ठाणे आगरा, सायबरक्राईम पोलिस ठाणे हावडा या पोलिस ठाण्यांमधील गुन्हे उघडकीस आले आहेत.
हि कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्तस्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गसर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे, सहायक निरीक्षक अमरीशदेशमुख, सिद्धनाथ बाबर, उपनिरीक्षक रायकर आणि त्यांच्या पथकाने केली.
अशी होती फसवणूकीची पद्धत ….
आरोपी टोळी तीन पातळ्यांवर काम करत होती. पहिल्या पातळीवर एखाद्या सर्वसामान्य माणसाला पैशाचे आमिष दाखवून त्याचेआधारकार्ड, फोटो, मोबाईल नंबर, बॅंक अकाऊंट वापरण्यासाठी घ्यायचे. त्याच्या नावाने एखाद्या शहरात गाळा भाड्याने घेऊन फर्म सुरुकरत होते. दुसऱ्या पातळीवर ऑनलाईन टास्क फ्रॉड करण्यासाठी ऑनलाईन ग्राहक शोधण्याचे काम केले जात होते. यामध्ये संबंधितनागरिकांना मेसेज करून जास्त उत्पन्नाचे अमिष दाखविण्याचे काम केले जात होते. तिसऱ्या पातळीवर आर्थिक फसवणूक करतपैशांची फेरफार केली जात असे.
महिलेची अशी झाली फसवणूक…
फिर्यादी महिलेला मोबाईलवर पार्ट टाईम जॉब करून पैसे मिळविण्यासंदर्भात मेसेज मिळाला. त्यानंतर संबंधित महिलेला वेगवेगळ्याहॉटेल्स व रेस्टॉरंटला रिव्हू व रेटींग देण्याचे काम असल्याचे सांगण्यात आले. या कामासाठी त्यांच्या अकाऊंटवर मोठी रक्कम जमाझाल्याचे सांगण्यात आले. महिलेने सुरुवातीला एक दोन वेळा काही रक्कम अकाऊंटवरून काढली. मात्र, नंतर अकाऊंट लॉक झालेआहे, पैसे गुंतवावे लागतील असे सांगत महिलेची 70 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
एकूण २०० कोटींची फसवणूक…
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी तब्बल ९५ बनावट बॅंक खाते उघडले होते. या बॅंक खात्यांमधून तब्बल २०० कोटींचे व्यवहारझाल्याचे उघकीस आले आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील फसवणूक झालेल्या नागरिकांची तब्बल साडेतीन कोटींची रक्कमआहे. ही खाती पोलिसांनी गोठविली असून तपास सुरु करण्यात आला आहे. तपासानंतर संबंधित नागरिकांना पैसे परत देण्याचीप्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
या टोळीने बँकेत खाते उघडण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने आलिशान कार्यालये उभा केली. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनीविश्वास ठेवत बँक खाती उघडली. मात्र एवढी मोठे व्यवहार या खात्यावरून होत असताना याकडे बँकेचे दुलर्क्ष झाले. विशेष म्हणजे 95 खात्यापेकी एक हि खाते नॅशनल बँकेत नाही.
ऑनलाईन टास्क फ्रॉडमध्ये पकडण्यात आलेले आरोपी सुशिक्षीत तसेच सायबर ज्ञान असणारे आहेत. त्यांनी आयटी तसेच सुशिक्षीतनागरिकांनाच आपले लक्ष बनविले आहे. नागरिकांनीही ऑनलाईन फसवणुकीबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे. अज्ञात मोबाईलक्रमांकावरून येणारे मेसेज, फोन याला रिप्लाय करू नये. तसेच कोणालाही आपली वैयक्तीक माहिती शेअर करू नये. आर्थिकगुंतवणुकीबाबत फोन कॉल येत असल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांना कळवावे.
– स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त