तुझ्या बापाने मला तसं करताना पाहिलं होतं का?….

उपमुख्यमंत्री अजित पवारांची जीभ घसरली

0

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर‌ होते. यावेळी एका जाहीर कार्यक्रमात त्यांची जीभ घसरली आहे. त्यांनी शरद पवार गटाच्या पदाधिकऱ्यांचा थेट बाप काढला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. मी भल्या सकाळी काम करतो तसं कोणता माय कालाल असं काम करतो ते दाखवा. पण तुमच्याच इथला की दीड शहाणा म्हणतो मी सकाळी सहा वाजता ठेकेदारांची कामं करायलाउठतो. त्याला म्हणावं तुझ्या बापाने मला तसं करताना पाहिलं होतं का? राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनीकाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर अजित पवारांवर अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवारांची अशी जीभघसरली आहे.

काय म्हणाले होते तुषार कामटे..?

नेहमी अजित पवार म्हणतात पहाटे उठून कामाला लागतो. शहराचा विकास केलाय. त्या अजित पवार यांनी केवळ ठेकेदारांचा आणित्यांच्या विचारांच्या लोकांचा विकास केलाय. ते पहाटे त्यांना भेटायला जायचे. पिंपरीचिंचवड शहरात कोणी लक्ष दिलं तर त्यांनाआवडत नसायचं. साधा फ्लेक्सवर फोटोवरून ते विचारणा करायचे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवडचेशहराध्यक्ष तुषार कामटे यांनी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.