वाकडच्या ‘स्पा सेंटर’मध्ये सुरु होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची कारवाई

0

पिंपरी : स्पा सेंटर मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोन आस्थापनांवर पिंपरीचिंचवड अनैतिक मानवी वाहतूकप्रतिबंधक कक्षाने कारवाई केली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागोपाठ दोन कारवाया झाल्या आहेत. स्पा सेंटर चालक, मालक आणि व्यवस्थापक काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे कारवायांमधूनउघडकीस आले आहे.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेस्टिंग स्क्वेअर मॉलमधील रीज स्पा या मसाज पार्लर मध्ये काही दलाल स्वतःच्या आर्थिकफायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पाचे नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात अशी माहितीअनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि. 8) स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई करतस्पा व्यवस्थापक उमेश उर्फ अनिकेत इंद्रजीत दुबे (रा. बाणेर गाव, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली.

उमेश दुबे आणि स्पा सेंटरची मालक महिला यांनी तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले होते. त्यांच्याताब्यातून पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायकपोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्रचव्हाण, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी पिंपळे सौदागर मध्ये कारवाई

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारची कारवाई झाली होती. पिंपळे सौदागर येथील स्पॉट 18 मॉलमधीलस्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने पर्दाफाश केला. मसाजच्यानावाखाली तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. यातून दोन तरुणींची पोलिसांनीसुटका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.