शिरुर : देशात शेठजी आणि भटजी यांची युती झाली की शोषण व्यवस्था निर्माण होते, अस महात्मा फुले सांगायचे. आज देशात मोदीआणि शहा हे तर राज्यात भटजी असल्याने, शेतीमालाला भाव मिळणार नाही, असे प्रतिपादन संभाजी बिग्रेडचे प्रवीण गायकवाड यांनीकेलं.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संसदरत्न खासदार डॉ. अमोलकोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर मध्ये जेष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा शिरूरच्या पाच कंदील चौकात पार पडली. यावेळी ते बोलत होते. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, अंकुश काकडे, आमदार अशोकबापू पवार, आ. रोहित पवार, उत्तमराव जानकर, नितेश कराळे, सुजताभाभी पवार, काकासाहेब पलांडे, जिल्हाध्यक्षजगन्नाथ बापू शेवाळे, देवदत्त निकम, सुरेश भोर आदी उपस्थित होते.
गायकवाड पुढे म्हणाले की, आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे काम करतोय, अस विकासासाठी सत्तेत गेलेले अजित पवारम्हणतात. आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही दोन पक्ष फोडलेत. देशातील 30 भ्रष्टाचारी नेत्यांपैकी 28 जण आजभाजप मध्ये आहेत, त्यामुळे भाजप आता भ्रष्टाचारी जनतापक्ष आहे
त्यामुळेच शिवराय फुले शाहू आंबेडकर विचाराचा उमेदवार निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे.