नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट – पृथ्वीराज चव्हाण

सांगवीतील जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोदी सरकारवर प्रहार

0

पिंपरी (प्रतिनिधी) :- देशातील ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.आर्थिक भ्रष्टाचाराबरोबर नैतिक राजनैतिक भ्रष्टाचारमोदी सरकारकडून सुरू आहे. महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकार शेतकयांचा सूड घेत आहे. देशभरात नरेंद्र मोदींच्याविरोधात प्रचंड मोठी लाट आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (दि.8 मे) सांगवीयेथील महाविकास आघाडीच्या सभेत मोदी सरकार भाजपवर सडकून टीका केली.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) – काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – शेतकरी कामगार पक्षस्वराज इंडियामित्रपक्ष  महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर पक्षप्रमुख आणिमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, मोदी सरकारमुळेबेरोजगारीचे भूत देशाच्या मानगुटीवर बसले. नोटबंदी, जीएसटी, शेतकरी काळे कायद्यांमुळे त्यांना अर्थव्यवस्था सांभाळता आलेलीनाही. डिझेल, पेट्रोलच्या किंमती वाढवून देश महागाईच्या घाईत लोटला. मनमोहन सिंह यांच्या काळातील आर्थिक विकासाचा दरराहिलेला नाही. आमदारांची खरेदीविक्री करून सरकारे पाडली जात आहेत. त्यांच्या मान्यतेने राज्य सरकारे पाडली जातात. नाखाऊंगा, ना खाने दुंगा म्हणणाया मोदींचे सर्वात भ्रष्ट सरकार ते चालवत आहेत. भाजपच्या काळात पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठाभ्रष्टाचार आहे. महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. शेतकयांचा मोदी सूड घेत आहेत.

साखरेवर, कांद्यावर निष्ठूरपणे निर्यातबंदी करून कोट्यवधी शेतकयांचे नुकसान केले. निर्यात बंदी उठवून पुन्हा भरमसाठ कर लावला. शेतकयाला दिलेले एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही. मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाड तयार झालेली आहे. काँग्रेस पक्षाचेउत्कृष्ट जाहीरनामा दिलेला आहे. सर्व घटकांना  न्याय देण्याचे काम इंडिया आघाडीचे सरकार करणार आहे.  सत्तेचा मलिदाखाण्यासाठी आमदार फरपटत गेले. पण मतदार त्यांना धडा शिकविणार आहेत. महाराष्ट्रातील जनतेला फितुरी, गद्दारी, विश्वासघातचालत नाही. संजोग वाघेरेंच्या निमित्ताने चांगला खासदार निवडून द्या आणि उध्दव ठाकरेंचे हात बळकट करा, असे आवाहन त्यांनीकेले.

मोदीजींची फक्त खोटं बोलण्याची गॅरंटी: खा. संजय सिंह

खासदार संजय सिंह म्हणाले, इथे असलेली गर्दी दाखवते की संजोग वाघेरे विजयी होत आहेत. उध्दव ठाकरे यांनी अरविंद केंजरीवालयांना अटक झाल्यानंतर दिल्लीत येऊन साथ दिली. ठाकरेंनी पाठ दाखवून कोणाला धोका दिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्याभूमीतून हाच संदेश देतो की, ज्यांनी उध्दव ठाकरे शरद पवार यांच्यासोबत गद्दारी केली, त्यांना माफ करू नका. बाईकचोर, सोनेचोरानंतर देशात पक्ष चोरणारे आलेले आहेत. मोदीजींची फक्त खोटं बोलण्याची गॅरंटी आहे. बेरोजगारी, महागाई, काळा पैसा, 15 लाख देणे, पक्के घर देण्यावरून खोटी गॅरँटी दिली. देशातील जतना त्यांना हरविण्यासाठी तयार आहे. ते जिंकले, तर संविधान, आरक्षण, निवडणूक संपवतील. त्यांचे हगे राजकारण संपविण्यासाठी गेल,

रामकृष्ण हरी, आमची मशाल भारी“: खा. सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हवा आपल्याच बाजुने आहे. तीन आपला लकी नंबर असून महाराष्ट्राच्या स्वाभीमानासाठी मतदानकरा. वाटप होणार, तर होणार आहे. गलिच्छ राजकारण सुरू आहे. राज्यात लाडके मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचे नाव आदरानेघेतले जाते. त्यांच्याकडून आमच्या सर्वांच्या प्रचंड अपेक्षा आहे. इंडिया आघाडी एक कुटुंबाप्रमाणे काम करत आहे. संजोगभाऊ तुम्हालामाझ्याबरोबर दिल्लीला चलायचं आहे.  देशातील सर्वात भ्रष्ट महापालिका म्हणून पिंपरी चिंचवडला म्हटले जाते. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी हद्दपार करण्यासाठी मतदान करा. मावळमध्येरामकृष्ण हरी, आमची मशाल भारीहा नारा आपल्याला बुलंद करायचाआहे, असे आवाहन त्यांनी केली.

मोदींची गॅरटी देशाला विकायची आहे का ?: खा. चंद्रकांत हंडोरे

खासदार चंद्रकात हंडोरे म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेमध्ये मोदी, फडणवीस, शिंदे, अजितदादा यांच्याविरुध्द असंतोष आहे. जनताआपल्या पाठिशी असल्याचे सर्वे येत आहेत. अंडरकरंट भाजपला उध्दव ठाकरेंच्या भाषेत तडीपार करणार आहेत. जनतेला गॅरंटटीच्यानावाने भुलवत आहेत. पण, त्यांनी दहा वर्षापूर्वी दिलेल्या गॅरंटीचे काय झाले, हे आधी सांगा. तुमच्या मोदींची गॅरटी देशाला विकायचीआहे का ? काँग्रेसने जे दिले, ते विकासयंचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. देशात जातीय धार्मिक वाद निर्माण करून देश तोडायचेत्यांचे धोरण आहे. त्यांची जुमलेमाजी आता चालणार नाही. फसव्या गॅरंटीला बळी पडू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.