पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतोय डेंग्यूचा प्रादुर्भाव

0

पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून डासोत्पत्ती स्थळ तयार होत आहेतवाकडमोशी आणि वाल्हेकरवाडीपरिसरात डेंग्यूचे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेतत्यामुळे मागील दहा दिवसांत पाच रुग्ण आढळून आले आहेतशहरात डेंग्यूचेरूग्ण आढळत असून चार रूग्णांची प्रकृती स्थिर आहेत्यांना उपचार करत घरी सोडले आहेपणएका रूग्णावर खासगी रूग्णालयातउपचार सुरू आहेत.

डेंग्यूचिकुनगुनियासारखे आजार टाळण्यासाठी महापालिकेने पावसाळा सुरू होताच खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या आहेतआस्थापनांनी तपासणी करून डासोत्पत्ती स्थळे नष्ट केली जात आहेनागरिकांवरही कारवाई केली जात आहेदरम्यानजूनमहिनाअखेरीस शहरात तीन तर गेल्या दाेन दिवसात दाेन असे पाच रूग्ण आढळले आहेत

वाकडवाल्हेकरवाडी  मोशी अशा वेगवेगळ्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होतेदरम्यानशहरात एकूण  डेंग्यु रुग्ण आहेतत्यापैकी  पुरुष   महिला रुग्ण आहेतत्यापैकी  रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहेतर उर्वरितएक रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत्या डेंग्यु आजाराचा रुग्ण निश्चित निदानासाठी सेंटीनल सेंटरचाच पॉझिटिव्ह अहवालआवश्यक आहे

कोणत्याही रॅपीड किटचा अहवाल निश्चित निदानासाठी ग्राह्य धरण्यात येत नाहीपावसाळयात महापालिका क्षेत्रात डेंग्यु रोग पसरुनयेत म्हणून वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहेयासाठी डासोत्पत्ती स्थानांवरील नियंत्रणाची उपरोक्त माहिती नागरिकापर्यंत पोहोचवूनजनजागृती करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉलक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.

एडिस डासांची पैदास रोखण्यासाठी हे करा

– सर्व पाण्याच्या टाक्या आणि कंटेनर झाकणाने झाकून ठेवा

– डेंग्यूच्या डासांची पैदास रोखण्यासाठी दर आठवड्याला कूलर

– फ्रीज खालील ट्रेमधील पाणी रिकामे करावे

– डासांचा प्रवेश रोखण्यासाठी दारे आणि खिडक्यांवर वायरची जाळी लावा

– सर्व  वापरलेले कंटेनररद्दीचे साहित्यटायरनारळाची टरफले योग्य विल्हेवाट लावावी

– फुलदाण्यातीलकुंड्यांतील पाणी दर आठवड्याला बदलावे

– डास चावण्यापासून वाचण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घाला

– एडिस डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी मॉस्किटो रिपेलेंट्स वापरा

डेंग्यू रुग्णामध्ये ही दिसतात लक्षणे

– तीव्र ताप

– तीव्र डोकेदुखी

– स्नायुदुखी  सांधेदुखी

– उलट्या होणे

– डोळयांच्या आतील बाजुस दुखणे

– अंगावर पुरळ

– अशक्तपणा

– भुक मंदावणे

– तोंडाला कोरड पडणे

– नाकातून रक्तस्त्राव  रक्ताची उलटी होणे

– रक्तमिश्रीतकाळसर रंगाची शौचास होणे

– पोट दुखणे

– रक्तदाब कमी होणे

– हातपाय थंड पडणे

Leave A Reply

Your email address will not be published.