बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरुणीवर गँगरेप

पोलिस मदत केंद्राच्या मागेच घडली घटना

0

पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवरसामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यातबलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे हि घटना पोलीस मदत केंद्राच्यापाठीमागील बाजूला घडली आहे.

नुकतेच दोन दिवसांपूर्वीच बोपदेव घाटात मित्रांसोबत फिरावयास गेलेल्या एका तरुणीचे कारमधून एका तरुणाने अपहरण केले होते. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग करून आरोपी तरुणीला सोडून पळून गेला होता त्यानंतर आता पुन्हाबलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संबंधित पीडित मुलगी ही मूळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथील राहणारआहे. दोघेही पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतात. गुरुवारी रात्री दोघे दुचाकीवरून बोपदेव घाटात फिरायला गेले होते. त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आल्या. त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिकबलात्कार केला. जिथं ही घटना घडली ती निर्जन स्थळी असल्यानं पीडितेला कोणतीच मदत मिळू शकली नाही.

बोपदेव घाटात जिथं लोक नेहमी जातात अशा ठिकाणी तरुण तरुणी दोघेच रात्री अकरा वाजता गेले होते. पीडितेसोबत एकच मुलगाहोता. बाराच्या सुमारास तिथं तिघांना हे दोघे दिसले आणि त्यांनी हे कृत्य केलं. आरोपींनी तरुणाला मारहाण केली आणि डांबून ठेवलं. शर्ट, बेल्टने बांधून ठेवलं. पीडितेची प्रकृती स्थिर आहे. तिचा जबाब घेतला आहे. मुलीला मारहाण करण्यात आल्याची माहिती नाही, मुलाला मारहाण झालीय असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

बलात्काराच्या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिचीवैद्यकीय चाचणी झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती कोंढवा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनीघटनास्थळी येऊन घडलेल्या घटनेची माहिती घेत आज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पाचवाजता याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेआरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या 10 टीम आणि डीबी पथकरवाना करण्यात आले आहे.

बोपदेव पोलीस चौकी मागेच हा गॅंग रेपचा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बीट मार्शल आणि पेट्रोलिंगवरप्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या घाटात वारंवार लुटमारीच्या घटना होत असताना देखील कोंढवा पोलिसांकडून त्याकडेजाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आता होत आहे. पोलीस मदत केंद्र केलं आहे. तिथं प्रत्येकवेळी लोक नसतात. मात्रपोलिसांचं पेट्रोलिंग सुरू असतं अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.