रॅपर बादशहा आणि पत्नी जॅस्मिममध्ये दूरावा

0

मुंबई ः बाॅलिवुडचा सद्याचा आघाडीचा समजला जाणार गायक व रॅपर बादशाह यशाच्या शिखरावर आहे. त्याच्या गाण्यांना प्रेक्षकांकडून मोठी पसंतीदेखील मिळत आहे. मात्र, दुसरीकडे त्याच्या वैवाहिक जीवन फारस चांगलं चाललं आहे, असे दिसत नाही. त्यांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्याचा मार्गावर आहे.

मीडिया रिपोर्टनुसार बादशगा आणि त्याची पत्नी जॅस्मिन काही दिवसांपासून वेगळे राहत आहेत. या दोघांना खूप दिवसांपासून एकत्र पाहिलेले नाही. त्यामुळे बादशहाच्या चाहत्यांना चिंता लागून राहिलेली आहे. असे असले तरी बादशहाकडून अजून अधिकृत माहिती आलेली नाही. असं सांगितलं जात आहे की, लाॅकडाऊनपासून बादशहा मुंबईमध्ये राहतो आहे तर, त्याची पत्नी जॅस्मिन पंजाबमध्ये राहत आहे.

बादशहाने २०१२ मध्ये जॅस्मिनसोबत विवाह केला होता. २०१७ मध्ये एका मुलीला जन्मदेखील दिलेला होता. बाॅलिवुडमधील अनेक चित्रपटांमधून बादशहाने गाण्यांना आवाज दिला आहे. सुल्तान, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, दबंद-३ अशा सिनेमांमधून बादशहाने सुपरहीट गाणी दिलेली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.