पुण्यात तयार झालेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी हक्क दाखवू नये

0

पिंपरी चिंचवड : पुण्यात तयार झालेल्या, पुणेकरांनी तयार केलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता टीका केली आहे.

पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
तुमच्या इथे 1400 कोटी, 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर एक लाख कोटींच्या गप्पा असतात. या गप्पा कोण मारतं तुम्हाला चांगलं माहीत आहेच. आज आहेत ‘ते’ आपल्या पुण्यात. बघा ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’. जग फिरल्यावर शेवटी आमच्या पुण्यातच लस सापडणार आहे. ही लस पुणेकरांनी शोधलीये, नाही तर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली.

पुण्यामध्येच ही लस तयार झालेली आहे, पुणेकरांनी ती लस शोधलेली आहे, त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी क्लेम केलं, तर गैरसमज नसावेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे.
आज या सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. सुरुवातीला म्हणत होते. सात दिवस टिकेल, सात महिने टिकेल आज तर वर्ष झालं. आता पुढची पाच वर्षेचं नव्हे तर 25 वर्ष कधी उलटतील हे कळणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.