मुंबई ः हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये अभिनेत्यापेक्षा त्याची पत्नीच कितीतरील पटीने श्रीमंत असल्याच्या दिसून आलेल्या आहेत. बाॅलिवुडमधला प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टी मोठा व्यावसायिक आहे, हे सगळ्यानांच माहीत आहे. मात्र, त्याची पत्नी माना शेट्टी हीदेखील मोठी व्यावसायिक आहे. सुनिल शेट्टीसारखा त्यांचाही व्यवसाय अनेक भागांत पसरलेला आहे. माना शेट्टी यांच्या जीवनासंदर्भात काही खास गोष्टी पाहू या…
माना शेट्टी कधी मोठ्या पडद्यावर आल्या नाहीत. मात्र, त्या एक यशस्वी उद्योजक आहेत. त्या एकाच वेळी अनेक व्यवसाय करताना दिसतात. त्या बिझनेसवुमन असल्यातरी एक यशस्वी सामाजिक कार्यकर्त्यादेखील आहेत आणि त्यांना रिअल ईस्टेटमधील राणी समजले जाते.
पती सुनिल शेट्टीसोबत माना शेट्टी यांनी एस-२ नावाचा रिअर ईस्टेटचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातंर्गत त्यांनी मुंबईच्या भागात अलिशान इमारती तयार केलेल्या आहेत. ६५०० स्क्वेअर फूटामध्ये पसरलेल्या त्यांच्या अलिशान इमारती अनेक सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर माना शेट्टी लाईफस्टाईल स्टोअरदेखील चालवितात, त्यामध्ये सजावटीच्या साहित्यांपासून रोज लागणाऱ्या वस्तूंपर्यंत प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे.
माना शेट्टी ‘सेव द चिल्ड्रेन इंडिया’ नावाची एनजीओदेखील चालवितात. त्याच्या फंडसाठी वेळोवेळी ‘आराईश’ नावाचे प्रदर्शनदेखील भरवितात. त्यातून जे पैसे येतात ते पैसे मुली आणि महिलांच्या गरजेसाठी वापरतात. मीडिया रिपोर्टनुसार सुनिल शेट्टी १०० करोड रुपयांचा बिझनेस करतात आणि त्यात माना शेट्टी महत्वाची भूमिका निभावतात.
सुनिल शेट्टी यांच्याकडे फ्लॅट, अलिशान गाड्या, बंगले, बाईक्स आणि अनेक रेस्टाॅरंटदेखील आहेत. ते स्वतःचे एक प्राॅडक्शन हाऊसदेखील आहेत. मात्र, सुनिल शेट्टी हे आपल्या पत्नीपेक्षा कमी कमवितात. या दोघांचे लग्न १९९१ मध्ये झालेले होते.