रिव्हॉल्वर बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

0

पिंपरी : बेकायदेशी रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि. 28) दुपारी सव्वापाच वाजता जुनी सांगवी येथे करण्यात आली आहे.

अभिषेक विष्णू कदम (21), लक्ष्मण गणेश शेळके (22, दोघे रा. जुनी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई नितीन खोपकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक हा ड्रायव्हर आहे. तर लक्ष्मण हा एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहे. ते दोघेजण जुनी सांगवी येथील श्रीकृष्ण मंदिरासमोर आले असून त्यांच्याकडे रिव्हॉल्वर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 10 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि तीन हजारांची तीन काडतुसे जप्त केली आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी भिसे, भोजने, केंगले, पाटील, मोरे, नरळे, खोपकर, देवकांत, देवकर, पिसे, गुत्तीकोंडा यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.