पुणे : अॅग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगोचे अनावरण खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण नुकतेच करण्यातआले. यावेळी अॅग्रो टुरिझम विश्वचे संस्थापक गणेश चप्पलवार, व्यवस्थापकीय संचालक मनिषा उगले, प्रकल्प प्रमुख वैभव खेडकर आणि दिलीप चप्पलवार उपस्थित होते. अॅग्रो टुरिझम विश्वने कृषी पर्यटनाला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. तसेच सुरु असलेल्या इतर कार्याची माहितीही गणेश चप्पलवार यांनी खासदार कोल्हे यांना दिली.
अॅग्रो टुरिझम विश्व शेतकरी, कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र चालक आणि पर्यटकांसाठी करतअसलेल्या काम बद्दल अमोल कोल्हें यांनी कौतुक केले. भविष्यातील उपक्रमासाठी ही शुभेच्छा त्यांनी शुभेच्छा दिल्या बदल ही काळाची गरज आहे. अँग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगो अर्थपूर्ण आहे. त्यात आभाळ, पक्षी, डोंगर, शेती, पीक, नागरणी करताना शेतकरी, झाडं, शेतातीलघर, छोटे पर्यटक, अशा विविध ग्रामीण भागाचे प्रतिबिंब या लोगोच्या माध्यमातुन दिसुन येते .दरम्यान कृषी पर्यटनाच्या माध्यमातुन शहरी भागातील लोकांना ग्रामीण भागातील संस्कृतीची ओळख करुन देणे हा उद्देश आहे. तसेच शेतकरी कशा पध्दतीने शेतात कष्ट करुन पिके पिकवितो याची जाण करुन देण्याचा प्रयत्न अॅग्रो टुरिझम विश्वने केला आहे. अस मत खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केले. आणि पुढील कार्यास त्यांनी शुभेच्छा अॅग्रो टुरिझम विश्वला दिल्या