…तर तो हत्येचा प्रयत्न ठरत नाही

दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

0

नवी दिल्ली ः ”लैंगिक अत्याचार किंवा बलात्कारासारख्या गुन्ह्यांंमध्ये आरोपी एड्सचा रूग्ण असल्यास निर्णय देताना या बाबींचा विचार करणं महत्त्वाचं असतं. मात्र, त्यासाठी भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०७ नुसार दोषी ठरवता येत नाही”, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान मांडले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने स्वतःच्या सावत्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एड्स रुग्ण असणाऱ्या आरोपीवर हत्येता गुन्हा दाखल झालेला होता. या प्रकरणात न्यायमूर्ती विभू बाखरू यांंच्या खंडीपीठासमोर सुनावणी झाली. यामध्ये आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला दोषी ठरविण्यात आले आहे.

निर्णय देताना न्यायालयाने म्हटले आहे की, ”एड्स संसर्ग झालेल्या व्यक्तीने जोडीदाराच्या सहमतीने संबंध ठेवल्यास त्याने हत्येचा प्रयत्न केला आहे, असे  म्हणता येत नाही. फारतर आरोपीने असुरक्षितपणे संबंध ठेवले, त्याला बेजबाबदारपणे वागणे म्हणता येईल.”

Leave A Reply

Your email address will not be published.