डाॅ. शीतल आमटे यांची आत्महत्या

'आनंदवना'तील घटनेमुळे सामाजिक क्षेत्रात शंकेला उधाण

0

चंद्रपूर ः आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शीतल आमटे यांनी  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषारी इंजेक्शन टाचून घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालात उपचारासाठी नेते असता डाॅक्टरांनी मृत घोषीत केले.

डाॅ. शीतल आमटे या डाॅ. बाबा आमटे यांच्या नात आणि डाॅ. विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ होत्या. शीतल आमटे यांनी काही अनुचित वक्तव्य केलेली होती. त्यासंदर्भात २५ नोव्हेंबर रोजी डाॅ. विकास आमटे, डाॅ.भारती आमटे. डाॅ.प्रकाश आमटे आणि डाॅ. मंदाकिनी आमटे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून डाॅ. शीतल आमटे या मानसिक त्राणात आणि नैराश्यात आहे, असे सांगितले होते.
तसेच आम्ही आमच्या भूमिकांशी, ध्येयांशी प्रामाणिक आहोत आणि नैतिक कायदेशीर मूल्यांची पारदर्शकता जपू, असेही नमूद केलेले होते. मात्र, डाॅ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येने आनंदवन आणि तेथील कार्यावर शंका उपस्थित केले जात आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.