असं म्हणतात की, खरं प्रेम करणारे रंग, रूप, धर्म, वय, संपत्ती, प्रतिष्ठा पाहत नाहीत. यामध्ये धर्म आणि वय या दोन गोष्टी सद्या खूप चर्चेचा विषय होताहेत. बाॅलिवुडचा विचार केला की, लक्षात येतं. अशा अनेक जोड्या आहे ज्यांनी वयाचा विचार न करता जोडीदाराशी विवाह केला. अशा आठ जोड्या हिंदी चित्रपटसृष्टीतील पाहाणार आहोत ज्यांच्या वयामध्ये बरंच अंतर आहे.
अमृता सिंह आणि सैफ अली खान ः नव्वदीच्या दशकात बाॅलिवुडमध्ये धमाल करणारी अभिनेत्री अमृता सिंह हिने सेफ अली खानशी विवाह केला होता. दोघांच्या वयामध्ये १२ वर्षांचे अंतर आहे. सद्या त्यांचा घटस्फोट झालेला आहे. सैफने नंतर अभिनेत्री करीना कपूरशी विवाह केला आहे.
प्रियंका चोप्रा आणि नीक जोनस ः आपल्या अभिनयाचा डंका बाॅलिवुड आणि हाॅलिवुडमध्ये वाजविणारी प्रियंका खूपच चर्चेत आहे. प्रियंकापेक्षा नीक हा १० वर्षांनी लहान आहे. यांच्या लग्नावरून प्रियंकाला खूप ट्रोल करण्यात आले, परंतु प्रियंकाला याची पर्वा नाही.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ः सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राॅय हिने अभिषेक बच्चनसोबत २००७ रोजी लग्न केले. लग्नाआधी अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केला होता. यांच्या लग्नाची चर्चा खूप झाली होती. ऐश्वर्या ही अभिषेकपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.
प्रिती झिंटा आणि जीन गुडइनफ ः गालावर पडणाऱ्या खळीमुळे आणि सुंदर अभिनयामुळे ओळखली जाणार प्रिती झिंटा २०१६ मध्ये अमेरिकन बाॅयफ्रेंड जीन गुडइनफ याच्यासोबत विवाह केला. जीन हा प्रितीपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.
बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोवर ः आपल्या फिटनेसने ओळखली जाणारी बिपाशा बसू हिने २००१ साली चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. २०१६ रोजी अभिनेता करणसिंह ग्रोवर याच्याशी बिपाशाने विवाह केला. बिपाशा ही करणपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे.
सोहा अली खान आणि कुणाल खेमू ः प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मुलगी सोहा अली खान बाॅलिवुडमध्येही जास्त नावारुपाला आली नाही. २०१५ मध्ये सोहाने अभिनेता कुणाल खेमू याच्याशी लग्न केले होते. कुणाल हा सोहापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे.
फराह खान आणि शिरीष कुंद्र ः प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराख खानने ३९ व्या वर्षी फिल्म एडीटर शिरीष कुंद्र यांच्याची विवाह केला. दोघांनी खूप चित्रपटं एकत्र केली आहेत. फराख खान ही शिरीषपेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे.
फरहान अख्तर आणि अनुधा भंबानी ः अभिनेता फरहान अख्तरपेक्षा त्याची पत्नी अनुधा भंबानीचे वय सहा वर्षांनी जास्त आहे. सद्या दोघेजण वेगळे झाले आहेत. आता फरहान अख्तर शिवानी दांडेकर यांना डेट करत आहेत.
-राधिका पार्थ