हिंजवडीच्या हद्दीत खुनाचे सत्र थांबता थांबेना

0
हिंजवडी : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचे सत्र काही केल्या थांबेना. दोन घटना ताज्या असताना २९ नोव्हेंबर रोजी बंगलोर मुंबई हायवेच्या बाजूला मोकळ्या जागेत संदीप पुंडलिक माईणकर यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवडाभरातील हि खुनाची तिसरी घटना असल्याने हिंजवडी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैद्य धंदे प्रमाणेच परिसरातील गुन्हेगारीला आळा घाण्यासाठी देखील पोलिसांनी धडक मोहीम हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पुंडलिक माईणकर मूळ गाव माईन ता. कणकवली जिल्हा सिधुदुर्ग यांचा कोणी अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संदीप यांची बॉडी उदणशाहवली दर्गा, बाणेर येथील कंपाऊंड व होर्डिंगच्या मध्ये आडोशाला टाकून त्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. खून का आणि कोणी केला अद्याप समजले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.