मुंबई ः ”मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलविणं सोप्प नाही. दक्षिण भारतातही फिल्मसिटी मोठी आहे, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्येही फार मोठ्या फिल्मसिटीज आहेत. योगी आदित्यनाथ त्या ठिकाणी जाऊन दिग्दर्शक, कलाकारांशी चर्चा करतील का? का मुंबईतच असे दौरे करणारे आहेत?”, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील फिल्मसिटी यूपीत हालविणार असल्याचे वक्तव्य केले होते. जाहीर केल्याप्रमाणे ते त्यासंदर्भात मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावरदेखील आले आहेत, अशा पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आवाज उठवत काॅंग्रेसने म्हंटलं आहे की, मुंबई चित्रपट उद्योग उत्तरप्रदेशमध्ये नेण्याचा डाव योगी आदित्यनाथ यांचा आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, जोरजबरदस्तीने राज्यांतील उद्योग जाऊ देणार नाही.