पुन्हा सरकारविरुद्ध शेतकरी आक्रमक 

0

नवी दिल्ली ः केंद्र सरकारविरुद्ध मागील आठवडाभरापासून सुरू असलेले कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. या विषयावर चर्चा करण्याासाठी सरकारने बैठक बोलवली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे दिल्ली-नोएडा सीमेवर  शेतकऱ्यांचे ताफे गोळा होत असल्यामुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे.

३५ शेतकरी संघटनांमधील पाच सदस्यांची टीम केंद्र सरकरबरोबर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, हे आमंत्रण शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी फेटाळले. कृषी कायदा रद्द करावा, याच भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे सरकारचा हा प्रयत्नदेखील निष्फळ ठरला असल्याचे दिसत आहे.

पंजाब, हरियाणा आणि आता उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनीदेखील आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. त्यांचे जथ्थेच्या जथ्थे दिल्लीच्या सीमेवर दाखल झालेले आहेत, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. तूर्तास, दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.