तीन पिस्टल, एक गावठी कट्टा जप्त

भोसरी पोलिसांची कामगिरी

0

पिंपरी : भोसरी पोलिसांनी शस्त्र विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून तीन पिस्टल, एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (२८, रा. फुगे आळी, भोसरी. मूळ रा. धुळे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिसांना मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की, पांजरपोळ शेजारील मोकळ्या मैदानात एक तरुण संशयितरित्या थांबला आहे. त्याच्याकडे पिस्तूल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचून रुपेश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन पिस्टल, एक गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ७५ हजार ८०० रुपयांचा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त करत त्याला अटक केली. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.