व्वा पठ्ठ्या व्वा!!!

'या' भारतीय पठ्ठ्याने क्रिकेटच्या स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियन मुलीला केला प्रपोज 

0

भारताने भलेही एकदिवसीय क्रिकेट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून परावभ पत्करला असेल. मात्र. एक भारतीय पठ्ठ्याने किक्रेट स्टेडियममध्येच ऑस्ट्रेलियन मुलीला प्रपोज केला आणि सर्वांचे लक्ष खेचून घेतले. या भारतीय मुलाचे नाव आहे दीपेन मनडालिया आणि ऑस्ट्रेलियन मुलीचे नाव आहे रोज विंबुश.

दोघेजण दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत आहेत. क्रिकेट स्टेडियममध्ये प्रपोज केल्यानंतर हे दोघे जण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. दीपेनने आपली लव्हस्टोरी इन्स्टाग्रामवर सांगितली आणि त्यांचा हजारोंच्या घरात लाईक्स आणि काॅमेंट्स मिळत आहेत.

दीपेनने आपल्या पोस्टमध्ये सांगतो की, ”तूच माझ्या जीवनात रंग भरलेले आहे. दोन वर्षांपूर्वी मेलबर्नमध्ये शिफ्ट झाल्यानंतर एक छोटीसी खोली घेतली आणि या घटनेनेच माझे आयुष्य बदलून गेले. माझ्या अगोदर एक महिना पूर्वी त्या खोलीत एक महिला राहत होती. रोज विंबूश तिचे नाव होते.त्या खोलीत मला काही पत्रं सापडली आणि त्या महिलेला शोधायला सुरूवात केली. मला फेसबुकवर सापडली आणि अशा पद्धतीने आमची भेट झाली.”

दिपेन पुढे म्हणतो की, ”मग, आम्ही पहिल्यांदा काॅफी पिण्यासाठी भेटलो, नंतर डिनरसाठी भेटर राहिलो. रोज पश्चिम सिडनीमधून मेलबर्नमध्ये येते. कारण, ती एक आरोग्य क्षेत्रात काम करणारी कार्यकर्ती आहे.” दिपेन आणि रोज दोघेही क्रिकेटचे चाहत आहेत. सहाजिक दीपेन भारतीय टीमला पसंत करतो आणि रोज ऑस्ट्रेलिया टीमला पसंत करते.

दीपेनने सांगितले की, ”जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तर, क्रिकेटबद्दलच बोलत राहिलो. मला वाटले की, हीच खरी संधी आहे रोजला प्रपोज करण्याची”, आणि दीपेन लाईव्ह मॅचमध्ये रोजला प्रपोज केले आणि त्या दोघांची व्हिडीओ वेगाने व्हायरल झाली.

जेव्हा टीम इंडिया रण काढत होती तेव्हा कॅमेरा गर्दीचा व्हिडीओ करत होता. मात्र, एकर मुलगा आपल्या गुडघ्यावर बसून एक मुलीला साखरपुड्याची अंगठी देताना दिसला. दीपेने रोज प्रपोज केला आणि रोजनेदेखील होकार दिला. त्यावेळी ग्लॅन मॅक्सवेल टाळ्या वाजवू लागला. रोजने दीपेला मिठी मारली आणि आनंद साजरा केला. भारताने हार पत्करली असली तरी टीमने सांगितले की, ही घटनाच आमचा सर्वात मोठी विजय आहे.

https://www.instagram.com/p/CISWvzSlK7k/?utm_source=ig_web_copy_link

Leave A Reply

Your email address will not be published.