शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी ‘आत्मक्लेश आंदोलन’ करणार 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची माहिती

0

मुंबई ः कृषी कायद्याविरोधात केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठींबा दर्शविला आहे. ३ डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आत्मक्लेश जागर’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

राजू शेट्टी म्हणाले की, ”केंद्राने शेतकऱ्यांवर तीन कृषी कायदे लादलेले आहेत. हे कायदे अन्यायी असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. मागील ७ दिवसांपासून दिल्लीत थंडीत शेतकरी बसलेले आहेत, तरी सरकार वेळकाढूची भूमिका घेत आहे.”

शेतकरी आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठींबा आहे. तो पाठींबा देण्यासाठी जागर आंदोलन करण्यात येणार आहे. पिठलं भाकर खाऊन आंदोलनाला सुरूवात करण्यात आहे. रात्रभर भजन-किर्तन केले जाणार आहे. केंद्राला सुबुद्धी दे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळू दे या मागणीसाठी आत्मक्लेश आंदोलन केले जाणार असून रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा जागर आंदोलन होणार असल्याची माहिती शेट्टींना दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.