मुंबई ः येत्या काळात महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहता का, या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार म्हणाले की, ”माझ्या माहितीप्रमाणे, सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नसून राष्ट्रीय राजकारणात जास्त आहे”, असे उत्तर देऊन शरद पवार यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत विचारलेल्या वरील प्रश्नाला उत्तर दिले. भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले होते की, आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल शरद पवार अजित पवार यांना नाही तर, सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील.” या वक्तव्याने राजकारणात चर्चेला उधाण आले होते.
मुलाखती शरद पवार पुढे म्हणाले की, ”सुप्रिया सुळे यांना राज्यात इंटरेस्ट नाही तर, नॅशनल पाॅलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे. त्यांना सर्वोत्तम संसदपटूचा पुरस्कारही मिळालेला आहे. प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो, तो इंटरेस्ट त्यांचा तिथे आहे.”