पत्रकाराने दिली होती सुपारी रेखा जरे यांच्या हत्येची

0

अहमदनगर ः रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीपर्यंत पोहोण्यात पोलिलांना यश आलं आहे. नगरमधील पत्रकार बाळ ज. बोठे असे या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. ”बोठे यांनी आणखी एका आरोपीच्या मदतीने ही हत्या घडवून आणली आहे”, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणात बुधवारीच तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. तपासात सागर भिंगादिवे आणि ऋषिकेश पवार यांची नावे समोर आली आहेत. या पाच जणांकडे चौकशी केली असता पत्रकार बोठे यांनी सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे समोर आले. बोठे यांना पकडण्यासाठी पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत.

आरोपींकडून सुपारी रक्कम ६ लाख २० हजार जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम बोठे आणि भिंगारदिवे यांनी मिळून दिली होती, असे पाटील यांनी सांगितले. यापूर्वी २४ तारखेला हत्येचा कट रचला होता. मात्र, आरोपींचा डाव फसला, अशी माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.