हैदराबाद ः हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांचा दिवस खास आहे. १५० वाॅर्ड्ससाठी ११२२ निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचे खास वैशिष्ट्य हे की, या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत केंद्रातील भाजपाने उडी घेतलेली होती. असदुद्दीन ओवेसी, चंद्रशेखर राव आणि भाजपा यांची तिरंगी लढत सुरू आहे. सद्यातरी एआईएमआईएम आणि टीआरएस यांनी मागे सोडून भाजपाच्या खात्यात ७८ जागा पडलेल्या आहेत.
तेलंगणातील भाजपाचे खासदार अरविंद म्हणाले की,”तेलंगणा राज्यात परिवर्तन होणे सुरू झालेले आहे. लोकसभा निवडणुक, उपनिवडणूक आणि हैदराबाद महानगरमपालिकेच्या निवडणुकांमध्ये ते स्पष्ट दिसत आहे. आपल्याला संध्याकाळपर्यंत थांबायला हवं. मात्र, टीआरएसला स्पष्ट संदेश लोकांनी दिला आहे की, नागरिकांना परिवर्तन हवं आहे.” भाजपाला ७८, एआईएमआईएम १६ आणि टीआरएसला ३२ जागा मिळालेल्या आहेत. भाजपा सर्वांपुढे असल्याचे दिसत आहेत.