मुंबई ःपदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे, त्यामुळे भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे. २० वर्षांनंतर पुणे मतदारसंघात भाजपाच्या पदरात पराभव पडला. त्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले की, ”विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल मतदारांचे मनापासून आभार. हे यश मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोटपावती आहे.”
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातही भाजपाला पराभवाला धक्का बसला आहे. नागपूर मतदार संघात महाविकास आघाडीची सरशी होती. अभिजीत वंजारी यांचा विजय झाला आहे. भाजपाचे संदीप जोशी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो होते. औरंगाबाद मतदार संघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाणांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. त्यांनी विजयाची हॅट्रिक साध्य केलेली आहे.
मगहाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि भाजपाने पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूक ही चांगलीच तापवलेली होती. एकमेकांवर प्रतिवार आणि टीका करत वेगात प्रचार केलेला होता. मात्र, मतदारांनी महाविकास आघाडीच्या पदरात यश दिलेलं आहे.