पुणे ः ”पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल काही आश्चर्यकारक काही नाही. तिघे मिळून एकत्र येवून लढल्यानंतर असंच चित्र दिसणार होतं. तरीही आम्ही निकराने लढलो. हिंमत असेल तर एकेकट्यानं लढावं”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
शिवसेनेला उद्देशून पाटील म्हणाले की, ”यातून शिवसेनेने बोध घ्यावा. अमरावतीत शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचा फायदा झाला. शिवसेनेनं अमरावतीची जागा गमावली आहे. मराठवाडा पदवीधरची जागादेखील राष्ट्रवादीनं जिंकली आहे. अमरावतीचा शिक्षक मतदार संघही राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. कारण, तिथं पहिल्या क्रमांकावरचे उमेदवार अनिल देशमुख यांचे मेहुणे राष्ट्रवादीच जातील. काॅंग्रेसने नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघ जिंकला. यात सिवसेनेला काय मिळालं? ”, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला.
”काॅंग्रेस, राष्ट्रवादी हे आपापली संघटना वाढवतेय आणि शिवसेनेचं खच्चीकरण होत आहे. शिवसेनेला चुचकारण्याचा आणि सरकार बनविण्यासी माझ्या या वक्तव्याचा संबंध नाही. केवळ जुन्या प्रेमातून सांगतोय”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.