‘या’ चित्रपटात असणार ही मुख्य नायिका

आशुतोष गोवारीकर आणखी एका 'बायोपिक'च्या तयारीत

0

मुंबई ः आशुतोष गोवारीकर यांना नेहमीच ऐतिहासिक चित्रपटांमुळे ओळखले जाते. ‘पानीपत’ या त्यांच्या चित्रपटामुळे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. आशुतोष गोवारीकर यांनी आणखी एका ऐतिहासिक चित्रपटावर काम सुरू केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तिच्यावर जास्त गोवारीकरांनी कष्ट घेण्यास सुरूवात केली आहे.

या चित्रपटात प्रसिद्ध लिज्जत पापड बनविणाऱ्या कामगारांच्या जीवनावर आधारित आहे. तसे पाहिले तर, या चित्रपटात ७ महिलांचे जीवन दाखविण्यात येणार आहे. मात्र, त्यात कियारा मुख्य भूमिकेत असणार आहे. अक्षय कुमारला ‘लक्ष्मी’ चित्रपटावरून नापसंती दर्शविली, त्याच पद्धतीने कियाराही प्रेक्षकांनी नाकारले होते. त्यानंतर ‘इंदू की जवानी’चा ट्रेरल रिलीज झाला, त्यावेळी तिला प्रेक्षकांनी लक्ष्मी चित्रपटावरून ट्रोल करण्यास सुरूवात केली.

परंतु, कियाराला गोवारीकरांच्या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली आहे, यातून आपली प्रतिमा आणखी चांगली करण्याची संधी कियाराला मिळाली आहे. असं सांगितलं जातं की, ‘कर्रम कुर्रम’ हे चित्रपटाचे नाव असावे. मागील एक वर्षांपासून आशुतोष यांची टीम यावर काम करत आहे. गोवारीकरांनी चित्रपटाती कथा पूर्ण केलेली आहे. आता त्याचे दिग्दर्शन ग्लेन बरेटो आणि अंकुश मोहला एकत्रितपणे करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.