मुंबई ः हिंदीतील अल्पावधित प्रसिद्ध झालेल्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचे लेखक अभिजीत मकवाना यांनी आत्महत्या केली आहे. अभिषेक मकवाना यांना घेतलेल्या कर्जामुळे सतत ब्लॅकमेल केले जात होते, म्हणून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.

अभिषेक मकवाना यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, अशी चारकोप पोलिसांनी नोंद केली होती. २७ नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. मात्र, कुटुंबियांनी सांगितले की, अभिषेक मकवाना यांनी कर्ज घेतले होते, त्यामुळे त्यांना धमक्या येत होत्या. कर्ज फेडण्यासाठी दबाव आणला जात होता. तसेच सायबर फ्राॅडचे बळी ठरले होते,” असेही घराल्यांनी सांगितले.
अभिषेक माकवाना यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे मेल आणि काॅल्स चेक केले, तर ते सर्व कर्ज फेडण्यासंदर्भातील होते. बांगला देश, मान्यमार आणि भारताच्या इतर भागातूनही असे काॅल आलेले आहेत.