टीआरएसच्या बरोबरीने एमआयएम

भाजपा पुन्हा मागे सरकली, तर काॅंग्रेसला २ जागा

0

हैदराबाद ः असदुद्दीन ओवेसींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये एमआयएम टीआरएसबरोबर आले आहे, तर भाजपा आणखी मागे सरकले आहे. सकाळचे चित्र पूर्ण पलटलेले दिसत आहे. आता टीआरएसने प्रथम, दुसऱ्या स्थानावर एमआयएम आलेला आहे. तर भाजपा तिसऱ्या स्थानावर आहे. काॅंग्रेसच्या वाट्याला फक्त २ जागा आलेल्या आहेत.

हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांचा दिवस खास आहे. १५० वाॅर्ड्ससाठी ११२२ निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचे खास वैशिष्ट्य हे की, या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत केंद्रातील भाजपाने उडी घेतलेली होती. असदुद्दीन ओवेसी, चंद्रशेखर राव आणि भाजपा यांची तिरंगी लढत सुरू आहे.

३० ठिकाणी मतमोजणी केंद्रांची स्थापना केली आहे. प्रत्येक सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. मागील वेळी टीआरएसने महापालिकेवर आपली सत्ता स्थापन केलेली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.