शिक्षक मतदार संघात आसगावकर यांचा 34 व्या फेरीत विजय

दत्ता सावंत यांची कडवी झुंज

0

पुणे : पुणे शिक्षक मतदार संघात महा आघाडीचे जयंत आसगावकर यांचा विजय झाला आहे. मात्र विजयासाठी त्यांना शेवटच्या फेरीपर्यंत कडवी झुंज द्यावी लागली. आसगावकर यांनी 33 फेरीपर्यंत निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न केल्याने अखेर प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या मतांमधील दुस-या पसंतीच्या मतांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आसगावकर यांना 25 हजार 985 मते मिळाली. तब्बल 36 तासानंतर 10 हजार 626 मतांनी विजय निश्चित झाला.

राज्यात पुणे शिक्षक मतदार संघाचा निकाल सर्वात अगोदर जाहिर होईल अशी अशा होती. त्यानुसार मतमोजणीची प्रक्रिया देखील सुरू होती. एकूण उमेदवारांची संख्या अधिक असल्याने वैध, अवैध आणि पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित करण्यासाठी गुरूवारी रात्रीचे साडे आकरा वाजले. यामध्ये शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंतीच्या मताथमध्ये निवडून येण्यासाठी संबंधित उमेदवाराला 25 हजार 114 हा अकडा पार करणे आवश्यक होते. परंतु पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुरूवातीपासूनच आघाडीवर आसलेले आसगावकर यांना पहिल्या पसंतीत केवळ 16 हजार 874 मते मिळाली.

यामुळे नियमानुसार निवडणूक यंत्रणेला दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. यामध्ये देखील 33 व्या फेरीपर्यंत आसगावकर यांना 25 हजारांचा कोटा पूर्ण करता आला नाही. 33 व्या फेरीत आसगावकर यांना 22 हजार 345, सावंत यांना 15 हजार 357 तर भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांना 7 हजार 294 मते मिळाली. यामुळेच आसगावकर यांच्या विजयासाठी शेवटची 34 फेरीची म्हणजे सावंत यांच्या दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. यात आसगावकर यांनी मतांचा निश्चित केलेला कोटा पूर्ण करत 25 हजार 985 मते घेतली. तर सावंत यांना 15 हजार 357 मते मिळाली. यामुळे आसगावकर यांचा 10 हजार 626 मतांनी विजय झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.