नवी दिल्ली ः हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांचा करोना संसर्ग झालेले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ते मागील माहिन्यात करोनाची भारतीय लस आलेल्या ‘कोव्हॅक्सीन’च्या चाचणी टप्प्यात भाग घेतला होता. तरीही ते करोना संक्रमित झालेले आहेत.
या घटनेमुळे सोशल मीडियातून चर्चेला उधाण आले आहे. भारत बायोटिकची ‘कोव्हॅक्सीन’ लस तिसऱ्या टप्प्यात आहे. ती लस घेऊनही अनिल वीज संक्रमित झालेले आहेत, त्यामुळे या लसीवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.
अनिल वीज हे रुग्णालयात उपचार घेताहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करवून घेण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे. अनिल वीज यांनी २० नोव्हेंबरमध्ये अंबालाच्या रुग्णालयात ‘कोव्हॅक्सीन’चा पहिला डोस घेतला होता. ‘कोव्हॅक्सीन’ लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार प्रोटोकाॅलनुसार ०.५ मिलीग्रॅम दिला जातो. नंतर २८ दिवसांनतर दुसरा डोस दिला जातो. तो डोस अजूनही अनिल वीज यांनी दिला गेलेला नाही.